कालचा (३ मार्च २०१८) पिंपरी - चिंचवड गृहनिर्माण सोसायट्यांच्या महासंघातर्फे आयोजित केलेला मोर्चा हा खऱ्या अर्थाने वाकड मध्ये जागृती आणि चैतन्य निर्माण करणारा होता. ह्या वर्षी पाऊस चांगला पडला आणि अगदी ऑकटोबर / नोव्हेंबर पर्यंत होता. तरीही १ जानेवारी पासून अचानक पाणी पुरवठा अर्ध्यावर आला. वाकड मधल्या अनेक संस्थांना पाण्याची समस्या आहेच, पण ज्यांना पाणी येत होते त्यांनाही पाणी येणे बंद झाले. जर महानगर पालिकेच्या सबबींवर विश्वास ठेवायचा तर ३१ डिसेम्बर २०१७ रोजी एकतर सगळ्या पाईप लाईन्स आकुंचन पावल्या किंवा वाकड मध्ये २/३ लाख लोक एकदम एकाच दिवशी राहायला आले असा होतो. महापालिका प्रशासन लोकांना वेडं समजत असावं बहुतेक. पण लोकांनी रस्तयावर उतरून आम्ही ही चालूगिरी सहन करणार नाही हे दाखवून दिले. फेडरेशन चे देशमुख काका आपल्या भाषणात म्हणाले की हे IT वाले केशवसुतांना अभिप्रेत असलेले "लाडके " आहेत. दुर्दैवाने आज IT मध्ये ती परिस्थिती राहिली नाही :) . पण जमलेली लोकं लाडकी नसली तरी केशवसुतांचे "नवे शिपाई " नक्कीच...