सकाळचे साडे नऊ , धडाम! ८५५५, निफ्टी खालच्या वाटोळ्याला (सर्किट) निपचित पडला. अपशकुनी १३ तारखेचा शुक्रवार वाकुल्या दाखवत होता. पोर्टफोलिओ बघण्याची ना हिम्मत नव्हती आणि ना उपयोग. त्याहीपेक्षा भांडवली बाजाराच्या विरोधकांमधील सर्वकालीन अग्रणींपैकी एक असलेल्या सौभाग्यवतींना काय तोंड द्यायचं ह्याचा विचार करून मेंदूचा भुगा होता.धीर करून तिच्या भरवशाच्या सोन्याचा दर बघितले , ते पण पडलेले ... जरा हायसं वाटलं. निदान - "तरी मी सांगत होते , शेअर्स वर पैसे लावण्यापेक्षा सोनं घे" हे ऐकून घ्यावं लागणार नाही. करोना विषाणू लागण झालेली लोकं कमी आणि गुंतवणूकदार जास्त मारणार हे खरं ठरणार बहुतेक. पण तसाही सगळीकडे अक्षरश: हाहाकार माजला आहे. २१ व्या शतकात शहरं विलगित केली जातात हा धक्का पचण्याआधीच प्रांताच्या विलगीकरणाची आणि त्या मागोमाग देशांच्या सीमा बंद झाल्याच्या बातम्या धडकल्या. अगदीच अकल्पित घडलं. गुंतवणूकदारांचं सोडाच, पण सगळे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत.प्रवास, बाजारपेठा, चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यालये ह्यांच्या बंदीमुळे आर्थिक चक्र थांबलं आहे. ऑलम्पिक सुद्धा रद्द करण्याची पाळी आली
कालचा (३ मार्च २०१८) पिंपरी - चिंचवड गृहनिर्माण सोसायट्यांच्या महासंघातर्फे आयोजित केलेला मोर्चा हा खऱ्या अर्थाने वाकड मध्ये जागृती आणि चैतन्य निर्माण करणारा होता. ह्या वर्षी पाऊस चांगला पडला आणि अगदी ऑकटोबर / नोव्हेंबर पर्यंत होता. तरीही १ जानेवारी पासून अचानक पाणी पुरवठा अर्ध्यावर आला. वाकड मधल्या अनेक संस्थांना पाण्याची समस्या आहेच, पण ज्यांना पाणी येत होते त्यांनाही पाणी येणे बंद झाले. जर महानगर पालिकेच्या सबबींवर विश्वास ठेवायचा तर ३१ डिसेम्बर २०१७ रोजी एकतर सगळ्या पाईप लाईन्स आकुंचन पावल्या किंवा वाकड मध्ये २/३ लाख लोक एकदम एकाच दिवशी राहायला आले असा होतो. महापालिका प्रशासन लोकांना वेडं समजत असावं बहुतेक. पण लोकांनी रस्तयावर उतरून आम्ही ही चालूगिरी सहन करणार नाही हे दाखवून दिले. फेडरेशन चे देशमुख काका आपल्या भाषणात म्हणाले की हे IT वाले केशवसुतांना अभिप्रेत असलेले "लाडके " आहेत. दुर्दैवाने आज IT मध्ये ती परिस्थिती राहिली नाही :) . पण जमलेली लोकं लाडकी नसली तरी केशवसुतांचे "नवे शिपाई " नक्कीच होते. आणि ह्या "नव्या मनूच्या,