Skip to main content

मुक्काम पोस्ट बोस्टन..

If you can not see the MARATHI text below, then please use following links

Part I
Part II

काल दुपारी (नेहमीप्रमाणे) काम नसल्याने खिडकीतून बाहेर बघत होतो..आभाळ कसं अगदी भरून आलेलं आणि सोसाट्याचा वाराही सुट्लेला.. क्षणभर वाटलं की मस्तपैकी टपरीवर जावून कटिंग चहा मारावा..

अशा वातावरणात चहाची तल्लफ येण्यात चूक काहीच नाही.. फक्त त्यासाठी कुठेतरी भारतात असायला हवा होतो.. :(

बघता बघता बोस्टनमधे येवून तीन महिने होत आले.. पण खरं पाहू जाता फार दूर आलोयं असं वाटतं नाही.. आणि तसं वाटण्यासारखी परिस्थिती पण नाही..

मागच्याच शनिवारी माझा एक मित्र कणकवलीहून आला, येताना माझ्या आईने दिलेले बेसनचे लाडू घेवून आला.. लगेचच मी घरी फोन करून ते मिळाले म्हणून कळवलं.. आणि आईने पण नेहमीप्रमाणे, 'कसे झालेत?, सगळ्या मित्रांना दे' असं सांगितलं.. जणू काही मी सांगलीत हॉस्टेलमधेच होतो..
आणि ह्या शनिवारी तर न्यू इंग्लड होळी पण साजरी झाली.

पुण्यातून कूल कॅब ने मंदारकडे निघालो तेव्हा जरा धाकधूक होती, टॅक्सीवाला रात्री ११ वाजता मुंबईत पोहचल्यावर उगीचच इकडे तिकडे फिरवून जास्त भाडं तर नाही ना मागणारं?, पण दिवसा ढवळ्या दहा डॉलरला टोपी घातली ती वॉलथॅम सेन्ट्रलच्या टॅक्सीवाल्याने.. बरं एवढं होवूनही त्याला ४ डॉलरची टीप देणं क्रमप्राप्त होतं.कंपनीतल्या मित्रांनी (तमाल) पाहून ठेवलेल्या गेस्ट रूम वर पोहचलो, तर यजमाणीनबाईंनी सुरुवात तर अमेरिकेच्या राष्ट्रभाषेत केली पण भारताच्या राष्ट्र्भाषेत त्या कधी आल्या हेच कळलं नाही.. आजूबाजूच्या खोल्यांमधे राहणारी शेखर, शशांक, मेहूल अशी सगळी जनता बैठकीच्या खोलीत बसली होती.. सगळेच देसी, टीव्हीवर बी4यू म्युझिक चालू होतं आणि मेहूल अन्नू मलिकचा उध्दार करत होता.. हे राम! अमेरिकेला आल्याबद्दल मला स्वत:बद्दल वाटणारा अभिमान पहिल्याच दिवशी संपला.. माझ्याआधीच जवळपास निम्मा भारत जणू इकडे आलेला होता.. आणि तो ही सगळा अस्सल देसी थाट घेवून.. असो थोडा फार जेट लॅग होता, त्यामुळे सरळ झोपून गेलो.. झोपण्याआधी अर्थात सुखरूप पोहचल्याचं घरी कळवलं.

दुसय्रा दिवशी सकाळी उठलो आणि मेहूल बरोबर ग्रोसरी घ्यायला गेलो.. तर मूडी मार्गावर एका रांगेत ३-४ भारतीय दुकानं.. त्यातलं नूरभाईंचं दुकान त्याचं फेवरेट होतं.. आणि त्या दुकानात काय नव्हतं? अगरबत्ती, कापसाच्या वाती, डाळ, तांदूळ, मॅगी, तयार चपात्या, पॅराशूट खोबरेल तेल, कालनिर्णय.. कोपय्रावरच्या वाण्याच्या दुकानात जे काही मिळेल, ते सारं काही.. त्याच भागात थोडीफार भारतीय हॉटेलं पण होती आणि नाव पण बॉम्बे महल वगैरे..

बोस्टन हे (अमेरिकेच्या मानानं) एक प्राचीन शहर आहे.. साधारण पणे ३००-३५० वर्षं जुनं.. अमेरिकन स्वातंत्र्यलढ्याच्या साक्षीदार असलेल्या अनेक इमारती/ठिकाणं इथे आहेत.. आणि ती त्या लोकांनी नीट सांभाळलीही आहेत..

बाकी बोस्टन आणि पुणे ह्यांच्यातलं आणखी एक साम्य म्हणजे विद्यार्थी वर्ग. बोस्टन मधे २०-२५ विश्वविद्यालये आहेत.. HBS, MIT, BU, Brandies, Bentely इत्यादि इत्यादि... त्यामुळे कॉलेज मधली जनता आणि त्यांचे उपक्रम ह्यांचे उत्साह्पूर्ण वातावरण तर आहेच.. फक्त इथल्या संस्था खरंच फार मोठ्या आहेत.. वयाने, आकाराने आणि कीर्तीनेही..

तर असा मोठा ऎतिहासिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेल्या लोकांना शहराचा अभिमान नसेल तर नवलचं! त्यातही इथले बरेच जण मूळ इंग्लंड/युरोपीय वंशाचे.. ह्या भागाला न्यू इंग्लंड असंही म्ह्टलं जातं.. त्यामुळे सभ्यपणा/चालीरीती जरा जास्तचं ..
थोडक्यात सांगायच झालं तर माणसं जरा शिष्ट आहेत :-D.
न्यूयॉर्क मधल्या लोकांना नाकं मुरडणं हे अस्सल बोस्टनवासी माणसाचं लक्षणं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही..

आणि बोस्टनमधले रस्ते! 'बोस्टन महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यानी पुण्याचा अभ्यास दौरा तर केला नाही ना?' अशी शंका येण्याइतपत इथले रस्ते खराब आहेत.. आणि खराब रस्त्यांना ते ही भरपूर पडणारा बर्फाला जबाबदार धरतात...पण बाकी वाहतुकीची शिस्त मात्र थेट अमेरिकी वळणाची..

नदी तर बोस्टनच्याही मधोमध वाहते.. चार्ल्स नदीवर डझनावारी पूल आहेत पण साधेसेच. रात्रीच्या वेळी डाउन टाउन मधल्या इमारतींचे त्या नदीतले प्रतिबिंब फार सुंदर दिसते.. आणि उन्हाळा म्हणजे बोटिंग/कयाकिंग करणारया मंडळींसाठी पर्वणीच.. नदीच्या दोन्ही बाजूंना इथे फार जागा फुकट घालवलेली आहे(मोकळी सोडली आहे ;-) ).. तिथे वेळ घालवणारी रिकामटेकडी मंडळीही उन्हाळ्यात खूप असतात..

आता वसंत ऋतू येत आहे.. मग बोस्टन फार सुंदर होऊन जाईल असं म्हणतात.. मग मात्र खरोखरची अमेरिका दिसेल अशी आशा करतो.. :)

Comments

Anonymous said…
Sahii ahe re Ekdum.. Tikade jaun ekdum write zalas ki.. good yaar.. keep it up
Anonymous said…
vachata vachata imagine pann kel, itke chhan aahe... ekdam chhan aahe...
Anonymous said…
Teli ... Full USA chi tour zali aamachi ... Clear kalale ki tumhala kahihi kam nahi / yet nahi ;-) ... Jokes apart, khup chan lihile aahe.
Boston madhye ajunahi lok TEA partych kartat ka re? Sorry, stupid question by a stupid person. ;)
Hope to visit Boston next weekend. Hope to see you.
Anonymous said…
Amya, Mala itkye diwas nustech watat hotye ki tula kahi kam nahi manun pan atta tar ekdam vishawas basla ahye tyawar. Ek goshta matra ahye tu je kahi lihilye ahes te ekdam zakkasch watlye
Rahul said…
Sahi re Amya....btw Boston Tea party kadhi ahe tuzi...
Anonymous said…
hey ,
amit tu writer wagere aahes hey aamhala mahit navte re , ekdum mast lihile aahes good job aagdi boston la aalya sarke watle ...
nantar chi pooravni kadhi nignar aahe ..swapna amit ghate..
borntodre@m said…
good one man! afterall u r not all the DIM, the way people think u r!
Anonymous said…
Sundar!!
Sakal chi saptaran pooravani wachalya sarakha.. Watatey.

Mala mahit hota.. tu chhan lihatoyas. Pan Publish karayla pan suruwaat kelis he aata mahit zala..

Typical lekhak watatoys..

---------------Pramod Gavali
Anonymous said…
Ekdam chan lihila aahe!!! :)
vachatana dolyasamor Boston cha chitra ubha rahat!!! :)
Anonymous said…
bandhu ekdam mast. sampurn chitr dolyasamor ubhe rahile. cool. asach lihit ja. maza bhau shobhatos.(haaa)-lalita
Anonymous said…
आता मी आणि काय लिहू?
या डझनभर लोकांना जे वाटलं ना, आगदी तसंच मला वाटतंय..
अरे पण साल्या इतकं चांगलं लिहिता येतं तर गप्प का बसला आहेस? लिहीत राहा ना राजा! :)

Popular posts from this blog

.... अवघे धरू सुपंथ

सकाळचे साडे नऊ , धडाम! ८५५५, निफ्टी खालच्या वाटोळ्याला (सर्किट) निपचित पडला. अपशकुनी १३ तारखेचा शुक्रवार वाकुल्या दाखवत होता. पोर्टफोलिओ बघण्याची ना हिम्मत नव्हती आणि ना उपयोग.  त्याहीपेक्षा भांडवली बाजाराच्या विरोधकांमधील सर्वकालीन अग्रणींपैकी एक असलेल्या सौभाग्यवतींना काय तोंड द्यायचं ह्याचा विचार करून मेंदूचा भुगा होता.धीर करून तिच्या भरवशाच्या सोन्याचा दर बघितले , ते पण पडलेले ... जरा हायसं वाटलं. निदान - "तरी मी सांगत होते , शेअर्स वर पैसे लावण्यापेक्षा सोनं घे" हे ऐकून घ्यावं लागणार नाही. करोना विषाणू लागण झालेली लोकं कमी आणि गुंतवणूकदार जास्त मारणार हे खरं ठरणार बहुतेक.  पण तसाही सगळीकडे अक्षरश: हाहाकार माजला आहे. २१ व्या शतकात शहरं विलगित केली जातात हा धक्का पचण्याआधीच प्रांताच्या विलगीकरणाची आणि त्या मागोमाग देशांच्या सीमा बंद झाल्याच्या बातम्या धडकल्या. अगदीच अकल्पित घडलं. गुंतवणूकदारांचं सोडाच, पण सगळे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत.प्रवास, बाजारपेठा, चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यालये ह्यांच्या बंदीमुळे आर्थिक चक्र थांबलं आहे. ऑलम्पिक सुद्धा रद्द करण्याची पाळी आली

माझी वाचनकथा

शशांकने खो दिल्यावर मी खरतर लगेचच पळायला पाहिजे होतं, पण आळस हा माणसाचा शत्रू आहे, शत्रूवरही प्रेम करा इत्यादी वाचलेल्या अनेक सुविचारांचा एकत्रित परिणाम झाल्याने आज मुहूर्त सापडला.. सर्वप्रथम ह्या सगळ्या प्रकाराबद्दल माझ्या मनात थोडी शंकाच आहे.. "तू जर ब्लॉग लिहितोस आणि स्वत:ला मराठी साहित्याचे उपासक समजतोस, तर मग सांग बघू काय काय वाचलय ते?" असं करणं म्हणजे "पोहता येत, तर मग जरा पाण्यात उडी मारून दाखव" ह्या धर्तीवर खिंडीत पकडणे होय. जर हा हेतू असेल तर मी तात्विक निषेध नोंदवतो आणि इथेच लिखाण थांबवतो, ;) ...अथवा पुढे वाचा (माफ करा पण आज्ञावल्या लिहून/वाचून if, else लिहायची सवय लागली आहे). वाचन हा सगळ्यात आवडता छंद. आणि लहानपणापासून मी हाती लागेल ते पुस्तक वाचायचो, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके दिवाळी अंक, कॉमिक्स, हे तर होतंच, पण सगळ्यात आवडीच्या पुस्तकांपैकी होती ती बालभारती, कुमारभारती. त्यांतले धडे फारच सुंदर होते, अर्थात परीक्षा नावाच्या एका राक्षसाने त्यातला आनंद अर्धा केला. संदर्भासह स्पष्टीकरण, कवितेचे रसग्रहण, भाषावैशिष्ट्ये असले प्रकार म्हणजे मला साहित्या